अक्षया देवधर कडे आहे काही खास!

अक्षया देवधर कडे आहे काही खास!

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर पाठकबाई या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या सर्व घराघरांत पोहचली आहे. गावरान अडाणी राणादा आणि मास्तरीण अंजलीबाईंची केमिस्ट्री महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना तुफान भावली. ह्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप जरी घेतला असला तरी अक्षया देवधर सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेट देत असते. 

 

 

 

 

याच सोशल मिडीयाच्या माध्यमातून अक्षयाने तिच्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन घेऊन येत असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी तिने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे. या व्हीडीयोमर्फत अक्षया देसी लुकमधून लवकरच मोठा मेकओव्हर करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आपली साडी चोळीतली अंजलीबाई मॉडल रुपात कशी दिसेल हि उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. आत्तापर्यंत ५० हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहून त्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 

'तुझ्यात जीव रंगला' ह्या मालिकेने रसिक प्रेक्षकांचा निरोप जरी घेतला असला तरी पुढील अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनात राज्य करील. या मालिकेतील प्रत्येक पात्र रसिक प्रेक्षकांच्या मनात चांगलीच रुंजी घालत असल्यामुळे, प्रेक्षकांचा जीव अजूनदेखील अंजली बाई आणि राणादा मध्ये रंगला असल्याचे दिसून येतेय.