राष्ट्रीय पुरस्कार विजेते ' राजेश मापुस्कर' करणार नेटफ्लिक्सच्या 'दिल्ली क्राइम सिझन २' वेब सिरीजचे दिग्दर्शन

राष्ट्रीय पुरस्कार विजेते ' राजेश मापुस्कर' करणार नेटफ्लिक्सच्या 'दिल्ली क्राइम सिझन २' वेब सिरीजचे दिग्दर्शन

नेटफ्लिक्स इंडियाद्वारे २०२१ साली येत असलेल्या त्यांच्या आगामी चित्रपटं, सिरीज आणि लघुपटाची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली, ज्यात एमी पुरस्कार विजेती सिरीज 'दिल्ली क्राईम' च्या दुसऱ्या सीजनचा देखील समावेश आहे. २०१९ साली नेटफ्लिक्सवर सादर झालेली ही सिरीज २०१२ सालच्या दिल्ली निर्भया गेंग रेपवर आधारित होती. ज्यात शेफाली शहा, रसिक दुगल, आदिल हसन आणि राजेश तैलिंग या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. रिची मेहता दिग्दर्शित आणि लिखित 'दिल्ली क्राईम' ला जगभरातील प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे, याच पार्श्वभूमीवर, दिल्ली क्राईमचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, विशेष म्हणजे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते ' राजेश मापुस्कर' या सिरीजच्या दुसऱ्या सीजनचे दिगदर्शन करणार आहेत. 

 


फेरारी कि सवारी आणि व्हेंटिलेटरच्या घवघवीत यशानंतर आता राजेश मापुस्कर नेटफ्लिक्सवरील 'दिल्ली क्राईम' च्या दिग्दर्शनात व्यस्त झाले आहेत. या सीजनमध्ये सुद्धा पहिल्या सीजनचे कलाकार घेण्यात आले असून, दिल्ली क्राईमचा दुसरा सीजन देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. राजेश मापुस्करांच्या हटके दिग्दर्शकीय कौशल्यातून सादर होत असलेला हा दुसरा सीजन कसा असेल, याची उत्कंठा आता प्रेक्षकांना नक्कीच लागली असेल.