"आपुनने एक ही मारा... " केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे केले कौतुक

"आपुनने एक ही मारा... " केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत

संपूर्ण देशात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. लसीकरणाचा पुढचा टप्पा १ मेपासून सुरू होणार आहे. 

केंद्र सरकारच्या या निर्णयाचं राज्यातील ठाकरे सरकारनेही स्वागत केलं आहे. असं असतानाच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मात्र या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. यासंदर्भात केदार शिंदे यांनी एक पोस्ट केली आहे. 

केदार शिंदे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “राज ठाकरे, आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या. अपुनने एकही मारा लेकीन सॉलिड मारा के नाही?,” असं शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच राज यांचा उल्लेखही शिंदे यांनी, “या काळात राजकारण न करता महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे उभा असणारा एकमेव राजा”, असा केला आहे. 

केदार शिंदेंच्या या पोस्टकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या असून ह्या पोस्टची चर्चा रंगलीय. काही दिवसांपूर्वीच लसींची संख्या वाढवण्यासाठी हाफकीन सारख्या संस्थांना लस निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी आपण केली होती, जी पंतप्रधानांनी मान्य केली असे ट्विट राज ठाकरे यांनी केलं होतं.