'बन मस्का' जोडीचे गुपित उघड !

क्षितिज दाते -ऋचा आपटे जोडीने केला एक वर्षांपूर्वीच गुपचूप साखरपुडा

'बन मस्का' जोडीचे गुपित उघड !

सध्या मराठी सिनेसृष्टीत 'लगीनघाई' सुरु झाली आहे. जिथे बघावं तिथे कोणत्या तरी सेलिब्रिटीचा साखरपुडा, केळवण, तसेच लग्नाची बातमी ऐकायला मिळतेय. लॉकडाऊनमुळे बऱ्याच मराठी कलाकारांनी आपले लग्न पुढे ढकलले होते. त्यामुळे ह्या वर्षी बरेचजण बोहल्यावर चढणार आहेत, किंबहुना काहीजण चढले देखील !  व्हेलेंटाईन डे च्या मुहूर्तावर आस्ताद काळे आणि स्वप्नाली लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी ताजी असतानाच मुळशी पॅटर्न फेम 'क्षितिज दाते' आणि तुझ्यात जीव रंगला फेम 'ऋचा आपटे' या सेलेब्रिटी जोडप्याने आपल्या नात्याची कबुली देत आपला साखरपुडा देखील एक वर्षापूर्वी झाल्याची बातमी दिली आहे.

या दोघांचा साखरपुडा गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये झाला होता, मात्र त्याबद्दल कोणालाही माहीत नव्हते. परंतु, नुकतच त्यांच्या एंगेजमेंटला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी चाहत्यांसमोर हे गुपित खुलं केलं आहे.

 

या दोघांनीं आपापल्या सोशल मीडिया साईटवर साखरपुड्याचा फोटो शेयर करत, चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यांच्या या पोस्टखाली शुभेच्छांचा वर्षाव होत असून, मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मित्रमंडळींनी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे.  


क्षितीज आणि ऋचाने ‘बन मस्का’ या मालिकेत एकत्र काम केले. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. त्यानंतर हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. क्षितीजची ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील भूमिका विशेष गाजली होती. आता लवकरच तो ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. तर ऋचाने ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकांमध्ये काम केले आहे.