'आश्रम'ची सरशी 

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२१ सोहळ्यात 'आश्रम'साठी बॉबी देओलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 

'आश्रम'ची सरशी 

राष्ट्रीय पुरस्काराने विजेते सिनेनिर्माते प्रकाश झा यांचे वेब सीरिजच्या जगात मोठे प्रस्थ आहे. त्यांची अभिनेता बॉबी देओलची प्रमुख भूमिका असलेली  एमएक्स ओरिजनल सीरिज आश्रम सीजन  १ आणि २ चांगलाच गाजला आहे. या वेबसिरीजला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर, आता ही वेबसिरीजची बेस्ट क्रिटिक्स म्हणून प्रशंसा होत आहे. या वेबसिरीजची दखल २० व्या भारतीय टेलिव्हिजन अकादमी अवॉर्ड्स २०२१ च्या लँडमार्क ओटीटी शो चा बहुमान मिळविला असून, यावर्षीच्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये बॉबी देओलने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला आहे.  

या यशाद्दल प्रकाश झा म्हणाले, “माझ्या टीमच्यावतीने आश्रमला इतका मोठा बहुमान दिल्याबद्दल मी आयटीए २०२१ चे आभार मानतो. तसेच दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये बॉबीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याचा देखील खूप आनंद आहे. हि सिरीज अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन निष्पाप लोक कशी बळी पडतात या सामाजिक कथेवर आधारित आहे. वास्तविक जीवनावर भाष्य करणारी हि वेबसिरीज लोकांना आवडत आहे"

सर्वोत्कृष्ट अभिनेता - दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२१ चा मानकरी बॉबी देओल म्हणाला, “प्रकाश झा यांनी माझ्यात बाबा निराला पाहिला आणि मला हे पात्र जिवंत करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. बाबा निरालाच्या पात्रात जाणे हा एक जीवन बदलणारा अनुभव आहे आणि तशी ओळख मिळवणे ही जगातील सर्वात आश्चर्यकारक अशी भावना आहे, असं मला वाटतं. हे पात्र आणखीन मोठे होईल, याचा मला विश्वास आहे. एमएक्स प्लेअरने या कथेला योग्य असे व्यासपीठ दिले आहे ".