प्रियांका चोप्रा लिखित ‘अनफिनिश्ड’ पुस्तक प्रकाशित

पुस्तकात काही चांगल्या आणि वाईट अनुभवांचा देखील उल्लेख, गृहप्रवेशाचे फोटो व्हायरल

प्रियांका चोप्रा लिखित ‘अनफिनिश्ड’ पुस्तक प्रकाशित
प्रियांका चोप्रा लिखित ‘अनफिनिश्ड’ पुस्तक प्रकाशित

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राच्या 'अनफिनिश्ड’ या पुस्तकाला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या पुस्तकात प्रियांकाने तिचा संपूर्ण जीवनप्रवास उलघडला आहे. तिने पुस्तकात काही चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला तर काही वाईट अनुभवांचा देखील उल्लेख केला आहे.

मोडेलिंग ते अभिनेत्री पासून ते जोनास घराण्याची सुनबाई होण्यापर्यंतचा तिचा प्रवास तिने यात मांडला आहे. निक जोनास सोबतचे तिचे काही अनसीन फोटोज देखील यात असून, नव्या घरात गृहप्रवेश करतानाचे फोटो पुस्तकामध्ये शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

watch more to click image 

प्रियांकाने तिच्या या पुस्तकात लॉस एंजलसमधील घरात गृहप्रवेश करतानाचे फोटो शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करत तिने ‘क्वारंटाइनच्या काळात नव्या घरात शिफ्ट होणे आमच्यासाठी खूप असमान्य होते. पण आम्ही हा गृहप्रेवशाचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला’ असे कॅप्शन दिले आहे.

प्रियांका बॉलीवूडची यशस्वी अभिनेत्री आहे. ती चांगली अभिनेत्रीच नव्हे तर आपल्या बुद्धिमत्ता आणि सौंदर्याच्या जोरावर तिने मिस इंडिया आणि मिस वर्ल्डचा किताबदेखील आपल्या नावे केला आहे. केवळ भारतात नव्हे तर जागतिक स्तरावर तिचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे निक जोनास आणि तिच्या लग्नाची चर्चा जागतिक स्तरावर रंगली होती. तिने आपल्या ग्रांड विवाहाचे काही क्षण आणि निक सोबतचे फोटोदेखील आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. 

प्रियांकाचे हे पुस्तक अभिनय आणि माॅडलिंग क्षेत्रात नशीब अजमावू पाहणाऱ्या लाखो युवतींसाठी आदर्शवत ठरणारे आहे. इतकेच नव्हे तर बॉलीवूडच्या प्रसिद्ध सेलेब्सनी देखील तिचे हे पुस्तक वाचण्याची इच्छा व्यक्त केली आहे.