ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन

कपूर कुटुंबात वर्षभरात दुसरा मृत्यू, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे होते धाकटे भाऊ

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा धाकटा भाऊ आणि अभिनेते राजीव कपूर यांचं आज निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

 

Click Image 

“मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय”, अशी पोस्ट रणधीर कपूर यांनी केली आहे. तर रणधीर यांच्याप्रमाणेच नीतू कपूर यांनीदेखील राजीव कपूर यांचा फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

'राम तेरी गंगा मैली' या 1985 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात नायक साकारून ते प्रचंड लोकप्रिय झाले होते. बॉलीवूडच्या अनेक सिता-यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  

राजीव कपूर अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक होते. राजीव कपूर यांनी 'एक जान हैं हम' या चित्रपटातून 1983  साली बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात ते मुख्य भूमीकेत दिसून आले होते. या शिवाय त्यांनी आसमान (1984), लवर बॉय (1985), जबरदस्त (1985) और हम तो चले परदेस (1988) चित्रपटात काम केले आहे. राजीव कपूर यांनी आ अब लौट चलें (1999), प्रेमग्रंथ (1996) और Henna (1991) या चित्रपटाचे निर्माते होते.  प्रेमग्रंथ  या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.